ईशा देओल आणि तिचा पूर्वाश्रमीचा नवरा भरत तख्तानी दिसले एकत्र

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पूर्वाश्रमीचा नवरा भरत तख्तानी फेब्रुवारी २०२४ मध्ये विभक्त झाले होते. ईशानं तिच्या नवऱ्यावर एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर असल्याचा आरोप करत घटस्फोट घेतला होता. पण आता वर्षभरानंतर हे दोघं पुन्हा एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एकत्र विमानतळावर पाहिलं गेलं होतं, पण त्यावेळी ते दोघे कुठे चालले आहेत, याबद्दल काही माहिती नव्हती. मात्र, आता त्यांचे ऋषिकेशच्या परमार्थ निकेतनमधून काही फोटो समोर आले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ईशा आणि भरत स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोंमुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, ईशा आणि भरत पुन्हा एकत्र येत आहेत का? घटस्फोटानंतर ही त्यांची पहिली एकत्रित झलक आहे. ज्या पद्धतीनं ते एकत्र दिसले ते पाहून असं वाटतं की त्यांच्या नात्यात काहीतरी सुधारणा होत आहे. पण नेमके ते दोघे एकत्र का आले त्याचं कारण काय? अशी चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here