इस्त्रायलने इराणवर केला हल्ला

इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इस्त्रालयाने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बहल्ले केले आहेत. याशिवाय इस्त्रालयाने इराणच्या लष्करी आणि अणुऊर्जा ठिकाणांवरही हल्ले केले आहेत. आपण शुक्रवारी सकाळी इराणवर हल्ला केल्याची माहिती इस्त्रायलकडून देण्यात आली आहे. इराणमधील स्थानिक माध्यमांनी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त दिलं आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायलने इराणसाठी अणुबॉम्ब तयार करणाऱ्या वैज्ञानिकांवरही हल्ला केल्याची माहिती दिली आहे.

इस्त्रालयच्या हवाई दलाने इराणच्या लष्करी आणि अणुप्रकल्पांच्या ठिकाणांवर डझनभरापेक्षा जास्त मिसाईल्स डागले आहेत. इस्त्रायची संरक्षण यंत्रणा आयडीएफने हा संयुक्त आणि आधीपासून ठरवण्यात आलेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपला या हल्ल्यात काही सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here