इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता! पुन्हा एकदा वादाची ठिणगी

सध्या इस्त्रायल आणि हमासच्या युद्धबंदी करार सुरु असून यातील पहिला टप्पा संपला आहे. दरम्यान आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला अल्टीमेटम दिला आहे. जर शनिवार इस्त्रायली बंधकांची सुटका झाली नाही, युद्धविराम करार समाप्त होईल. नेतन्याहू यांनी हमासच्या युद्धविराम उल्लंघनावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सुरक्षा व राजकीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, “जर हमासने शनिवारपर्यंत आमचे सर्व बंधक सोडले नाहीत, तर युद्धविराम संपेल आणि इस्रायली संरक्षण दल (IDF) हमासला निर्णायक पराभूत करण्यासाठी पुन्हा युद्ध सुरु करेल.” त्यांनी हे स्पष्ट केले की, हा निर्णय सर्व कॅबिनेट सदस्यांनी एकमताने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील हमासला ओलिसांच्या सुटकेचा इशारा दिला होता.

गाझा सीमा क्षेत्रात इस्रायली सैन्य तैनात करण्याचे आदेश नेतन्याहूंनी दिले आहेत त्यांनी म्हटले आहे की, “हमासने बंधकांची सुटका न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी इस्रायली सैन्याला गाझा पट्टीच्या आत आणि आजूबाजूला सैन्य जमवण्याचे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत. ऑपरेशन सुरू आहे आणि लवकरच पूर्ण होईल.”

युद्ध पेटणार?

मध्येपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे युद्धविरामाचा निर्णय आता हमासच्या पुढील कृतीवर अवलंबून आहे. नेतन्याहू आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here