एआयचा गैरवापर करु प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत.ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबतही असा प्रकार घडला आहे. त्यामुळे जग्गी वासुदेव यांनी दिल्ली हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.
सुनावणीदरम्यान जग्गी वासुदेव यांच्यावतीने वकील साईकृष्ण राजगोपाल यांनी बाजू मांडली. जग्गी वासुदेव यांच्या नावाचा वापर करून अनेक उत्पादने विकली जातायत, अनेक बनावट वेबसाइट्स सद्गुरूंच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप वकिलांनी केली. यावेळी त्यांनी गर्भ यात्रा (गर्भधारणेवर) नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ज्याच्या मुखपृष्ठावर सद्गुरूंचा फोटो आहे. या फोटोच्या वापरासाठी जग्गी वासुदेवकडून यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. अशा प्रकारे सद्गुरूंच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जातेय. यामुळे जग्गी वासुदेव यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची बाजू वकिलांनी मांडली.
सुनावणीदरम्यान गुगलच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने उच्च न्यायालयात बाजू मांडली. पीडित पक्षांना त्या वेब लिंक्सची माहिती शेअर करावी लागेल, तरच गुगल कोणतीही कारवाई करू शकेल, असे त्यांनी सांगितले. मार्चमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने युट्यूबर श्याम मीरा सिंग यांना सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याविरुद्ध कथितपणे बदनामीकारक व्हिडिओ बनवण्यास आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने श्याम मीरा सिंग यांना ईशा फाउंडेशनविरुद्ध पोस्ट केलेले ट्विट आणि व्हिडिओ हटवण्याचे निर्देशही दिले होते.