गेल्या काही दिवसांपासून ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान सोबतचं कनेक्शन उघडकीस येत असून, देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईसुद्धा आता तिच्या रडारवर असल्याची बाब समोर आल्याचं म्हटलं जात आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने मुंबईतील लालबागच्या राजाच्या गर्दीचेही व्हिडीओ काढल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. आयएसआयसाठी कथित स्वरुपात हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा मुंबईत आली होती आणि इथं तिने लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडीओ काढले होते.
उपलब्ध माहितीनुसार तिने चार वेळा मुंबई दौरा केल्याची माहिती समोर येत असून त्यामुळं आता मुंबईसुद्धा ज्योतीच्या आणि पर्यायाने पाकिस्तानच्या रडारवर असल्याचं म्हटलं गेलं. याचदरम्यान तिच्याकडे असणारे मुंबईचे व्हिडीओसुद्धा माध्यमांच्या हाती लागल्यानं एकच खळबळ माजली आहे.