कतरिना कैफच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होताना दिसत आहे. या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच करिश्मा नावाच्या एका मैत्रीणीच्या लग्नात उपस्थिती लावली होती. या लग्नातले अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये ती सुरज की बाहों में गाण्यावर कतरिना डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीबरोबर कबीर खान यांची मुलगीदेखील दिसत आहे. दोघी सुरज की बाहों में या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे गाणे लोकप्रिय चित्रपट जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील आहे. या चित्रपटात तिच्यासह हृतिक रोशन, फरहान अख्तर प्रुमख भूमिकेत दिसले होते.
याआधी कतरिनाचा आणखी एक व्हि़डीओ व्हायरल होताना दिसला होता. ज्यामध्ये ती ससुराल गेंदा फूल या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. त्याबरोबरच, कतरिनाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये कतरिना व तिच्या बहिणीचे काही फोटो पाहायला मिळाले होते.