डार्क सर्कल्स म्हणजे पाच आजारांची लक्षण! जाणून घ्या कोणते?

डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स दिसतात, ते झोपेच्या कमतरतेमुळे होतात असं आपण समजतो. पण, शरीरातील डार्क सर्कल्स काही आरोग्याच्या तक्रारींचं लक्षण सुद्धा असू शकतात. आज आपण डार्क सर्कल्स कोणत्या गोष्टींचा इशारा देतात या विषयी जाणून घेणार आहोत.

अ‍ॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता)

जर शरीरात आयर्न कमी असेल, तर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. त्यामुळे थकवा येतो आणि डार्क सर्कल्स दिसू शकतात.

थायरॉइडची समस्या

थायरॉइड ग्रंथी म्हणजे हार्मोन्सचं संतुलन बिघडवलं, तरही डार्क सर्कल्स दिसू शकतात.

व्हिटॅमिन्सची कमतरता

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन्स B, K, E आणि D या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेला पोषण नीट मिळत नाही आणि डार्क सर्कल्स तयार होतात.

शरिरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)

जर तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल, तर त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डार्क सर्कल्स दिसतात.

हायपरपिग्मेंटेशन

उन्हात सतत राहिल्यानं त्वचेत मेलानिनचं प्रमाण वाढतं आणि त्वचा काळसर दिसू लागते, ज्यामुळे डार्क सर्कल्स अधिक जाणवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here