बैठी जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी, ताणतणाव आणि अनुवांशिक घटकांमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढत आहेत. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) सारख्या परिस्थिती, जिथे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि जीव गमवावा लागू शकतो. ब्लॉक केलेल्या धमन्यांसाठी सर्वात प्रभावी वैद्यकीय उपचार एक म्हणजे स्टेंट्सचा वापर करणे. अनेक लोकांना स्टेंटबद्दल भिती आणि गैरसमज असल्याचे दिसून येते.
हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक रुग्णांना योग्य रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्टेंटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हृदयाच्या आजारात स्टेंटचा वापर करण्यात येतो. हा बॅालपेनच्या स्प्रिंगच्या आकारासारखा असतो आणि आकुंचन पावलेल्या आर्टरीला दीर्घकाळ उघडी ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.