मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 8,561 रुपये प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम 9339 रुपये प्रति ग्रॅम आहे18 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम 7005 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे.
टॅरिफ वॉरमुळं पसरलेल्या अनिश्चिचततेमुळं डॉलरदेखील कमजोर होताना दिसत आहे. त्यामुळं वायदे बाजारात पहिल्यांदा सोनं 93,000 हजारांच्या वर पोहोचले आहे. आज सकाळी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोनं ओपनिंगलाच 1500 रुपयांपर्यंत उसळलं होतं. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यात 1286 रुपयांची तेजी आली आणि सोनं 93,319 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदी यावेळी 821 टक्क्यांनी वाढून 92,416 रुपयांवर ट्रेड करत आहे. यापूर्वी चांदी 91,595 रुपयांवर स्थिरावली होती.
कमोडिटी एनालिस्टनुसार, ट्रम्पने चीनवर 145 टक्क्यांची टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर स्टॉक्स मार्केटमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. तर, एकीकडे चीनदेखील माघार घेण्यास तयार नाहीये. या टॅरिफ वॉरमध्ये अमेरिकी उत्पादनांवर टॅरिफ वाढत आहे. अमेरिकीच्या उत्पादनावर चीनचा 84 टक्के टॅरिफ लादण्यात आल्याचा परिणाम दिसतोय. याचमुळं सोन्याच्या दरात तेजी अशीच राहण्याची शक्यता आहे.