कधी खावा शिजवलेला भात? शिळ्या भाताचे काय दुष्परिणाम? घ्या जाणून

असे अनेक लोक आहेत ज्यांना शिळा भात खायला आवडतो. अगदी सकाळच्या नाश्त्याला देखील काहीजण फोडणीला देऊन भात खातात. पण शिळा म्हणजे एवढंच नव्हे तर अगदी एक तास अगोदर शिजवलेला भात देखील शिळा भात समजला जातो. फ्रिजमध्ये ठेवलेला भात देखील शिळाच असतो. त्यामुळे नक्की कधी शिजवलेला भात खावा, कोणता भात खाण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असतो हे जाणून घेऊ!

शिळा भात तुमच्या पोटावर परिणाम करतो. कारण अशा भातातून Basillus Cereus सारखे बॅक्टेरिया शरीरात शिरकाव करतात. हा जीवघेणा विषाणू कच्च्या तांदळात असतो. या बॅक्टेरियावर उष्णतेमुळे कोणता परिणाम होत नाही. अगदी भात शिजवल्यावरही कोणताच परिणाम होत नाही. एवढंच नव्हे तर हा विषाणू वाढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा भात शिळा होतो तेव्हा त्यावर या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here