मानवी शरीरातील सर्वात छोट्या हाडाला इजा झाली तर काय होऊ शकते? घ्या जाणून

मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात, ज्यांचे आकार वेगवेगळे असतात. आतापर्यंत तुम्ही ऐकले असेलच की आपल्या मांडीचे हाड हे शरीरातील सर्वात मोठे असते आणि त्याला ‘फेमर’ म्हणतात. हे शरीरातील सर्वात मोठे आणि मजबूत हाड मानले जाते. त्याची लांबी सुमारे 13 ते 18 इंच असते. शरीरातील कोणत्या अवयवाचे हाड सर्वात लहान असते हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहित नसेल. तज्ञांच्या मते, आपल्या कानातील स्टेप्स हाड हे शरीरातील सर्वात लहान हाड आहे. त्याचा आकार इतका लहान आहे की तुम्ही तो तुमच्या बोटाच्या टोकावर ठेवू शकता.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या अहवालानुसार, स्टेप्स हाड आपल्या कानाच्या मध्यभागी असतो आणि मानवी शरीरातील सर्वात लहान हाड मानला जातो. त्याच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर, स्टेप्स हाडाचा व्यास सुमारे 1.14 मिमी म्हणजेच 0.05 इंच आहे. या हाडाची लांबी सुमारे 2 ते 3 मिमी असते. जर इंचांमध्ये पाहिले तर हे हाड 0.1 इंच इतके आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते जितके लहान असेल तितकेच ते आपल्या कानांसाठी महत्वाचे आहे. स्टेप्स हाडामुळेच कानांचे कार्य योग्य राहते आणि आपल्याला व्यवस्थित ऐकू येते. जर कानाच्या या हाडाला इजा झाली तर ती व्यक्ती बहिरी होऊ शकते. म्हणूनच हे हाड ऐकण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here