अमरावती विमानतळाला नाव देण्यात आलेले संत गुलाबराव महाराज कोण?

अमरावती विमानतळाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. या विमानतळाच्या नावावरुन मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. अखेर आज लोकार्पण सोहळ्याच्यावेळी प्रज्ञाचश्रू गुलाबराव महाराज विमानतळ असं नाव देण्यात आलं. यानंतर संत गुलाबराव महाराज नेमके कोण याबाबत चर्चा सुरु आहे.

वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व येऊनही 34 वर्षात 130 ग्रंथ, सहा भाषेंवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य विचारसरणीला फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी ‘मधुराद्वैत’ मधुराभक्ती आणि अद्वैत विचाराची मांडणी केली.

गुलाबराव महाराज यांना दृष्टी नसली तरी ते प्रज्ञाचक्षु होते. ते स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या मानत. अवघं 34 वर्ष त्यांचं आयुष्य होतं पण या काळात त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा समजून घेण्याचं सामर्थ्य अनेक विचारवंतही कमी पडले, असं म्हटलं जातं. एढंच नव्हे तर गुलाबराव महाराजांनी एक नव्हे तर पाच भाषेत ग्रंथांची निर्मिती केली. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे गुलाबराव महाराज जगासमोर आले.

21 व्या शतकातले जगद्गुरु म्हणून संत गुलाबराव महाराज आहेत असं अनेक संतांचं म्हणणं आहे. श्री संत गजानन महाराज आणि श्री संत गुलाबराव महाराज यांच्यात बंधू भगिनी भाव होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात तैल चित्राचा कुठलाही भाव नव्हता. संत ज्ञानेश्वरांचे मूळ चित्र इतिहासात कुठंही उपलब्ध नसताना संत गुलाबराव महाराज यांनी सर्वात आधी संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा जगाला दिली. ही संत गुलाबराव महाराजांनी महाराष्ट्राला सर्वात मोठी देणगी आहे.

संत गुलाबराव महाराज यांची वयाच्या आठव्या वर्षीच दृष्टी गेली. मात्र महाराजांनी विविध विषयांवर 130 ग्रंथांची निर्मिती कशी केली हा प्रश्न अनेकांना पडतो. महाराज कधी चिंतनाला बसले की भक्त त्यांना प्रश्न विचारायचे. यावेळी चिंतन सुरु असायचे. अशावेळी बाबाजी महाराज पंडित, व्यंकटराव देशपांडे, हरीभाऊ केवले, लक्ष्मणराव, भाऊसाहेब खापरे ही त्यांची पाच शिष्यमंडळींनी महाराजांच्या प्रत्येक शब्दन् शब्द लिहून ठेवला. यामधूनच 130 ग्रथांची निर्मिती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here