पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यानंतर एक वादग्रस्त वक्तव्य केलं. माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी हा भारताचा इतका द्वेष का करतो याचं कारण २२ वर्षांपूर्वीची एक घटना आहे. २००३ मध्ये शाकिब नावाच्या दहशतवाद्यावर भारताच्या बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) ने गोळीबार केला होता. यात मारला गेलेला शाकिब हा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ होता. भावाची भारतीय सैनिकांनी हत्या केली त्यापासून तो भारताचा विशेष राग करतो असे समोर आले आहे.
शाहिद अफरीदीचा चुलत भाऊ शाकिब हा ७ डिसेंबर २००३ रोजी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स सोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. भारताच्या बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने शाकिब याला हरकत-उल-अंसारचा बटालियन कमांडर असल्याचे सांगितले होते. शाहिद अफरीदीचा भाऊ शाकिब हा जागतिक दहशतवादी हाफिज सईदच्या संपर्कात होता. शाकिबकडून मिळालेल्या काही कागदपत्र आणि दस्तऐवजीतून तो पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा भाऊ असल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती त्यावेळी बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने दिली होती.