लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही असे भुजबळ म्हणाले. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतासाठी नाही असे भुजबळ म्हणाले. ते नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी मागेच सांगितले होते की स्वतःहून त्यांनी सांगावे मी या नियमांमध्ये बसत नाही. एवढे करुनही ती मंडळी यामध्ये बसत असतील तर ते अडचणीचे होते. अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडकी बहिण योजनेतून माघार घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं. आतापर्यंत दिले असेल त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल असंही भुजबळ म्हणाले. पोर्टल बंद नाही, मी डिटेल माहिती घेऊन सांगतो असे ही ते म्हणाले. जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी कृपा करून थांबावे. खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल. पोर्टलबाबत मी मंत्र्यांसोबत बोलून घेईन असेही छगन भुजबळ म्हणाले.