दह्यासोबत हे पदार्थ खात असाल तर सावधान! आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

दही हा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेक पदार्थांमध्ये आपण दही वापरतो. पण असे अनेक अन्नपदार्थ आहेत की ज्यात दही वापरलं तर ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे दह्याचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने दही हे खूप फायदेशीर आहे. म्हणून डॉक्टरही दुपारच्या जेवणात दही खाण्याचा सल्ला देतात. पण काही पदार्थ खाताना दही खाल्लं तर त्याच शरीरात जाऊन विष तयार होतं. कोणत्या पदार्थांसोबत दही खाऊ नये जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार काही खाद्यपदार्थ दह्याबरोबर खाल्ल्यास शरीरातील पचनप्रक्रियेत गडबड होते, ज्यामुळे पचनसंस्थेचे संतुलन बिघडते. फळे, मच्छी, बटाटे या गोष्टी दह्याबरोबर एकत्र खाल्ल्यास शरीरात गॅस, ॲसिडिटी निर्माण होऊ शकते. रात्रीच्या वेळी सुद्धा दही खाऊ नये कारण त्यामुळे कफ होण्याची शक्यता असते.

फळं आणि दही

अनेकांना फळं आणि दही एकत्र खाण्याची सवय असते. पण ही सवय घातक ठरू शकते. आंबट फळांसोबत (जसे की संत्री, द्राक्षे, लिंबू) दह्याचा वापर पचन तंत्रासाठी अपायकारक ठरतो. आंबट फळांतील ॲसिड आणि दह्यांतील लॅक्टिक ॲसिड एकत्रित होऊन पचनक्रियेत असंतुलन निर्माण करतात. त्यामुळे पोटात गॅस, सूज किंवा जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आंबट फळांऐवजी सफरचंद, केळी किंवा पेरू यांसारखी सौम्य फळे निवडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

साखर आणि दही

दही साखर खायला अनेकांना आवडतं. परंतु, साखर आणि दही एकत्र घेतल्याने शरीरातील पचनक्रिया मंदावते. दह्यात साखर मिसळल्यास त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्यामुळे शरीरात सूज, एलर्जी किंवा ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
यासाठी दही गोडसर करण्यासाठी मध किंवा गूळ यांचा पर्याय निवडणे अधिक चांगले ठरते.

कांदा आणि दही

कांदा हा सुद्धा गरम असतो आणि तो दह्यासोबत मिसळल्यास त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. कांदा आणि दही एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

उडदाची डाळ आणि दही

उडदाची डाळ दह्यासोबत खाल्ल्याने पचनसंस्थेला अडथळा निर्माण होतो आणि अतिसार आणि आतड्यांना सूज येऊ शकते.
आतड्यांना सूज येणे, जुलाब होणे, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

दही हा आरोग्यासाठी उपयोगी आहेच पण कशासोबत खाव आणि कशासोबत नाही याचे नियम पाळले तरी फायदेशीरच आहे. योग्य आहार पद्धतींचा अवलंब करून आपण आरोग्यास टिकवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here