पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागणार आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.
घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका सिलेंडरसाठी 825 रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे.