महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. ४९४ कोटींचा हा रेल्वे मार्ग आहे. पुणे रेल्वे विभागाकडून राहुरी – शनी शिंगणापूर नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देण्यात आली आहे. तबब्ल १८ लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यानचा हा रेल्वे मार्ग आहे. २१.८४ किमी नवीन रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली आहे. यासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, शिर्डी, नेवासा येथील इतर तीर्थस्थळांनाही फायदा होणार आहे. शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाण आहे. तेथे नेहमीच भाविकांची रहदारी असते. शनिशिंगणापूर येथे दररोज ४५ ते ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात.