मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (National Security Guard) मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या वडिलांनी तहव्वूर राणाचं भारतात होणारं प्रत्यार्पण हे राजनैतिक यश नसून, सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेला बदला असल्याची भावना व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “संदीप हा 26/11चा पीडित नाही. तो एक सुरक्षा कर्मचारी होता ज्याने मृत्यूला तोंड देत आपले कर्तव्य चोख बजावलं. त्याला खात्री होती की तो परत येणार नाही. जर त्याने मुंबईत हे केलं नसतं तर दुसरीकडे कुठेतरी केले असते. आपली मुख्य चिंता असा हल्ला रोखण्याची असली पाहिजे, जेणेकरून आपण या लोकांना होणारे नुकसान कमी करू शकू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “राणाच्या प्रत्यार्पणामुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली यालाही परत आणण्याची गरज आहे.”