कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. थेट विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला. या घटनेवरुन सर्वच विरोधी पक्षांकडून कोकाटे यांच्यावर टीका करण्यात आली. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील कोकाटे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. कृषिमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत असल्याची टीका मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
कृषीमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत आहे. विधानसभेचा बहुमुल्य वेळ मंत्री महोदय सत्कारणी लावताना पाहून राज्याची खूपच प्रगती झाली आहे असे वाटत आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरच या मंत्र्यांना आता काम नसल्यामुळं घरी बसवायला हरकत नाही, अशी टीका किल्लेदार यांनी मामिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.