माणिकराव कोकाटेंचा राजीनामा की खातेबदल

विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना महागात पडलं आहे. माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल करण्याबाबात हे पत्र असल्याच सूत्रांकडून समजत आहे.

मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्या अशी मागणी जोर धरत होती. पण कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेतलं जाणार आहे. त्यांचा खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here