माणिकराव कोकाटे यांना ऑनलाईन रमी खेळणे चांगलेच भोवले आहे. कोकाटेंचं कृषिमंत्रीपद जाणार असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर दत्तात्रेय भरणे यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) कृषिमंत्रीपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती असा दावा केला आहे. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. छगन भुजबळ म्हणाले, , ‘ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खातं चांगलं आहे, हे तुम्ही घ्या.’