कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी प्रकरण गाजत असून, विरोधक राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. सोमवारी मी त्यांना भेटणार असून, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
“मला जी माहिती मिळाली त्यानुसार, सभागृहात आत हे घडलं आहे. विधीमंडळाचा परिसर राम शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या अख्त्यारित येतो. त्यांनी चौकशी सुरु केल्याची माझी माहिती आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही. खेळत नव्हतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी किंवा मंगळवारी माझी त्यांच्याशी भेट हाईल,” असं अजित पवार म्हणाले.