मराठी माणसासाठी गरळ ओकली आणि पत्नीवरच गुन्हा

मराठी माणसाविरोधात वादग्रस्त विधाने करणारे भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिक गौतम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनामिका गौतम यांनी मेडिकल कॉलेजसाठी बँकेतून 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. मात्र त्यांनी हे कर्ज फेडलेलं नाही. हेच 100 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्तीचं नाव देवता पांडेय असं आहे. देवता हा निशिकांत दुबेंचा समर्थक म्हणून ओळखला जातो.

झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी बुधवारी या संदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. अनामिका गौतम यांच्या विरुद्ध हा 47 वा गुन्हा आहे, असे मरांडी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्रही लिहिले आहे. काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून ही कारवाई केली असावी. राजकीय लढाई थेट असायला हवी. कुटुंब आणि समर्थकांना टार्गेट करणे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. राजकीय सूड म्हणून सत्तेचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा मरांडी यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here