नाटक हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण नाटक यशस्वीपणे उभं करण्यासाठी पडद्यामागे अनेक कलाकार काम करत असतात. या सगळ्या कलाकार, तंत्रज्ञ टीमला बांधून ठेवण्याचं काम करतो तो नाट्यसूत्रधार. नाटकाची सगळी सूत्र या व्यक्तीच्या हातात असतात. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावं लागत. तेव्हा कुठे नाटकाचा प्रयोग यशस्वी होतो. 1970 पासून नाट्यक्षेत्राशी गोट्या सावंत हे नाव जोडलं गेलं आहे. 5 दशकांहून अधिक काळ त्यांचा या क्षेत्रातला प्रवास आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास, गोट्या या नावाचा किस्सा, नाटकामागचे किस्से जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद नक्की पहा