अमरावतीत विवाहितेची आत्महत्या! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

महाराष्ट्रात आणखी एक वैष्णवी फासवर लटकली आहे. अमरावतीमध्ये एका महिलेने पतीच्या छळामुळे आत्महत्या केली आहे. मृत महिलेचा पती अधिकारी पदावर कार्यरत आहे. पतीने पत्नीसह धक्कादायक कृत्य केले आहे. मृत महिलेच्या आईने तिच्यापतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

पतीच्या छळामुळे 30 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली आहे. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे.

शुभांगी आणि निलेशचा यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दोघांना दोन मुली आहेत. पहिली मुलगी तीन वर्षाची तर, दुसरी मुलगी एक वर्षाची आहे. लग्नानंतर काही दिवसानंतरच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीच्या आई वडिलांनी केला आहे. शुभांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले असा आरोप मृत शुभांगीच्या आईने केला आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगे नगर पोलीस करत आहे. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे व सासू याना गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here