मुंबईत अनेक स्ट्रीट फूड उपलब्ध आहेत. प्रत्येकाची अनोखी चव असते. तुम्ही नेहमीचे पदार्थ खाऊन तुम्ही जर कंटाळा असलं तर आज आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी आणली आहे. तुम्हाला तिखट, मसालेदार काही तरी खावेसे वाटतं असेल आणि जास्त वेळही नसेल आणि झटपट नाश्ता हवा असेल तर मसाला पाव ही डिश तुमच्यासाठी उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया झटपट मसाला पाव बनवण्याची रेसिपी.
लागणारे साहित्य
- 4 पाव
- 2 चमचे बटर
- 1 टीस्पून तेल
- 1 लहान शिमला मिरची (बारीक चिरलेली)
- 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
- 1 कांदा (बारीक चिरलेला)
- 1-2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
- अर्धा कप शिजवलेला भाजी मसाला (उरलेली पावभाजी असल्यास उत्तम)
- ½ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- ½ टीस्पून हळद पावडर
- 1 टीस्पून लाल मिरची पावडर
- 1 टीस्पून पाव भाजी मसाला
- ¼ टीस्पून गरम मसाला
- 1 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरून, गार्निशसाठी)
- 1 लिंबू (चव वाढवण्यासाठी)
कसा बनवायचा मसाला पाव?
सगळ्यात आधी, एक तवा गरम करा. त्यात 1 टेबलस्पून बटर आणि थोडे तेल घाला. आता त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता सिमला मिरची आणि टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत 2-3 मिनिटे शिजवा.
आता त्यात हळद, तिखट, पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालून मिक्स करा. पाव मध्ये मसाला भरा. झाला मसाला पाव रेडी.