महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असताना पहिल्यांदाच हगवणेंच्या मोठ्या सुनेने म्हणजे मयुरी हगवणेने धक्कादायक खुलासे केले आहेत.
वैष्णवीसोबत जे काही झालं ते माझ्याबरोबरही झालं आहे. लग्नाच्या सहा महिन्यानंतरच असा प्रकार घडायला सुरुवात झाली. सासरे माझ्यासोबत जे वागले ते मी सांगूही शकत नाही, असा खुलासा मयुरीने केला आहे. अपमानास्पद वागणूक, मारहाण या सगळ्या त्रासाला मी देखील सामोरी गेली आहे, असा धक्कादायक खुलासा तिने केला.
पिंकी ताई म्हणजे माझी नणंद ही पाच वर्षांनी मोठी आहे. तिचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्या घरात फक्त तिचीच चालते. नणंद जे सांगेल ते आम्ही ऐकायचं आणि तेच करायचं अशी तिकडची पद्धत आहे. हगवणे कुटुंबात सुनांपेक्षा लेकीला जास्त महत्त्व आहे. माझ्यावरही वर्षभर छळ झाला. पण त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली आणि मी नवऱ्यासोबत वेगळं राहायला सुरुवात केली आहे.