सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात केल्यानंतर, आज त्यांचं पुण्यातील निवासस्थानी आगमन झालं. त्यामुळे, हिंदूत्ववादी संघटना व त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. यावेळी, पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा देखील काढण्यात आली असून स्वतः पुरोहित या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान, पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही कर्नल पुरोहित यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. यावेळी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, द कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स हा सिनेमा काढायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली.