सोनम रघुवंशी म्हणाली, त्याला मारुन टाका! मारेकऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

गेल्या काही दिवसांपासून देशात मेघालयात हनिमूनासाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं प्रकरण गाजत आहे. पोलीस तपासात दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. राजा रघुवंशीला मारण्यासाठी मारेकरी डोंगरावर चढताना थकले होते. त्यानंतर सोनम चिडली होती. राजला मारण्यासाठी तिने मारेकऱ्यांना पैसे वाढवून दिले.

सोनमने २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा प्लॅन बनवला होता. त्या दिवशी तिने शेवटचा फोन तिच्या सासूला केला होता. ती तिच्या सासूशी बोलत असताना पायऱ्या चढत होती. त्यासोबत तीन मारेकरीही पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढताना मारेकरी थकले. अशा परिस्थितीत ते मारण्यास नकार देऊ लागले. नंतर, तिन्ही मारेकरी राजा रघुवंशीसोबत चालायला लागले. थकल्याचे नाटक करून सोनम त्यांच्या मागे चालत होती.

मारेकरी हत्येला उशीर करत होते. सोनमला हे सहन झाले नाही. यानंतर तिने मागून ओरडून त्याला मारण्यासाठी दबाव टाकला. यावर आरोपी म्हणाले की, आम्हाला डोंगर चढून कंटाळा आला आहे. सोनमला त्यांच्यावर खूप राग आला. तिला राजला संपवायचं होतं. त्यामुळे सोनमने त्यांना अजून पैसे देऊ केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीला मारण्यासाठी सोनमने मारेकऱ्यांशी १४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. जेव्हा ते नकार देऊ लागले तेव्हा सोनम म्हणाली की मी तुम्हाला २० लाख रुपये देईन. मग तिने राजाच्या पर्समधून १५ रुपये काढले आणि मारेकऱ्यांना दिले की त्यांना त्याला मारावे लागेल. आरोपींनी पोलिसांसमोर या सर्व गोष्टी कबूल केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here