मेट्रो 7A चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

लवकरच मेट्रोच्या 2 मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 7 मेट्रोना एकाच ठिकाणी जोडणाऱ्या मेट्रो 7A मार्गिकेने मोठा टप्पा पार केला आहे. मेट्रो 7A मार्गिकेसाठी भूमिगत बोगद्याचा ब्रेकथ्रु आज पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भूमिगत बोगद्याचा दिशा नावाच्या टनेल बोअरींग मशीनद्वारे ब्रेकथ्रु झाला.

मेट्रो 7A हा मुंबईतील मेटो प्रकल्पाना एकत्र जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईतील 7 मेट्रो प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या मेट्रो मेट्रो 7Aच्या या 3.4 किमीच्या प्रकल्पामुळे वसई विरार, मिराभाईंदर तसेच ठाणे; नवी मुंबईसारखे परिसर थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहेत. मेट्रो 7A ही अंधेरी ते विमानतळापर्यंत जाणे सोप्पे होणार आहे. या मेट्रोमुळं हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.

मेट्रो 7A हा मार्ग दहिसर ते मीरा भाईंदर म्हणजेच मेट्रो 9चा विस्तार आहे. या मार्गावर एकूण 10 स्थानके आहेत. मेट्रो मार्ग 7 अने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल(interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांना जोडणी देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here