मिका सिंगने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. मिकाने सांगितलं की त्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान व गुरदास मान यांना महागड्या अंंगठ्या घेतल्या होत्या.
तो म्हणाला “मी शाहरुख खान, गुरदास मान आणि अमिताभ बच्चन यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची अंगठी भेट दिली. मला फक्त या तीन लोकांसाठी काहीतरी करायचे होते”.शाहरुख खानने अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला होता, असंही मिकाने नमूद केलं. शाहरुखने ही अंगठी म्हणजे खूप महाग गिफ्ट आहे, असं म्हणत परत करण्याचा प्रयत्न केला. पण मिकाने ती घेण्यास नकार दिला. “तेव्हापासून आम्ही थोडा संवाद साधू लागलो, तो हिमेश रेशमियाबरोबर मी एक शूट करत होतो, त्यासाठीदेखील आला होता,” असं मिका म्हणाला.
सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधू शकतो याबद्दल खूप कृतज्ञ वाटतं, असं मिकाने म्हटलं आहे. “आम्ही नेहमी पंजाबीत बोलतो आणि माझ्या वाढदिवसाला सर्वात आधी ते शुभेच्छा देतात,” असं मिका म्हणाला. त्याने अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं. “त्यांच्यासारखे लोक फक्त एक काळ गाजवतात असं नाही तर ते लोकांच्या मनावर राज्य करतात. तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहता,” असं मिका म्हणाला.