मंत्री येती पाहणीला, ठेकेदार लागती कामाला

आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले खड्ड्यांनी चाळण झालेल्या मुंबईत-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे ठेकेदारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर पॅचवर्क करण्यात येतंय. महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायवर्शन सुद्धा काढण्याचे काम सुरू करण्यात आलंय.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा त्यांनी पनवेलमधील पळस्पे येथून सुरू केला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील महामार्गाची त्यांनी यावेळी पाहणी केली. तसंच, अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी सूचनाही दिल्या. मात्र शिवेंद्रराजेंच्या दौऱ्याआधीच ठेकेदार कामाला लागले असल्याचे चित्र आहे, गेल्या 14 वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here