बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस पाठवलीय. मिथून यांनी मालाड परिसरातील ग्राउंड आणि मेझानाइन मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सांगण्यात येतंय. यासंदर्भात त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली आहे. मेझानाइन फ्लोअर हा एक आंशिक फ्लोअर असतो, जो सहसा दोन मजल्यांमध्ये असतो.
दरम्यान मिथून चक्रवर्ती यांनी या नोटिशीला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘मला मालाडमधील एरंगल येथे सुरू असलेल्या बीएमसी मोहिमेचा एक भाग म्हणून नोटीस मिळाली आहे. माझ्याकडे कोणतेही बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम नाही. तरी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, आम्ही त्यांना उत्तर देत आहोत’.