प्रशांत कोरटकर कुठे? विरोधकांच्या आंदोलनात अमोल मिटकरीही सहभागी!

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. विरोधकांच्या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही, हे आंदोलन विरोधकांचे असल्याचं पाहून सहभागी झालो नसल्याचं म्हणत अमोल मिटकरी यांनी अशांना भर चौकामध्ये फाशी देण्याची मागणी केली. मी विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही, उलट त्यांनी जे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वारंवार घाणेरडी प्रवृत्ती जन्म घेत आहे, भगतसिंह कोश्यारी यांचाही आम्ही निषेध व्यक्त केला होता. प्रशांत कोरटकर हा भामटा कुठे लपून बसला आहे. राहुल सोलापूरकरला का वाचवलं जात आहे? अशा प्रवृत्तींना भर चौकात फाशी देऊन लटकवलं पाहिजे. महाराजांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मी स्वत: सभागृहात मांडणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here