वैष्णवी हगवणे प्रकरणी एका आमदार पुत्राला अटक

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पिंपरी-चिंचवडमधील बावधन पोलीसांनी एका आमदार पुत्राला अटक केली आहे. या आमदार पुत्राने आठ दिवस फारर राहिलेल्या वैष्णवी हगवणेचा छळ करणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना लपण्यासाठी आश्रय दिला होता. बावधन पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

लोणावळा, मावळ, साताऱ्याबरोबरच थेट कर्नाटकमधूनही पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांनी हगवणे पिता-पुत्राला मदत केल्याप्रकरणी अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे:

1) मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, वय 60, वडगाव-मावळ

2) बंडू लक्ष्मण फटक (वय 55) लोणावळा

3) अमोल विजय जाधव (वय 35) पुसेगाव, खटाव, सातारा.

4) राहुल दशरथ जाधव (वय 45) पुसेगाव, खटाव, सातारा.

5) प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47) कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक.

आमदाराचा मुलगा कोण?

या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रीतम वीरकुमार पाटील हा काँग्रेस आमदार वीरकुमार पाटील यांचा पुत्र आहे. गेल्या कार्यकाळापर्यंत काँग्रसचे आमदार होते. २८ वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे ऊर्जामंत्री देखील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here