आमदार पानमसाला खाऊन सभागृहात थुंकले, विधानसभा अध्यक्ष संतापले

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज (४ फेब्रुवारी) सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं आणि विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना विधानसभेत घडलेल्या एका प्रकारावरून चांगलेच संतप्त झाले. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत एका आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरावरून विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी संबंधित आमदाराला चांगलेच सुनावले.

विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी सभागृहात घडलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हा प्रकार अनुशासनहीन असल्याचं म्हटलं. तसेच विधानसभेत ज्या आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारली ते आमदार कोण आहे? हे त्यांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिल्याचं म्हटलं. मात्र, आता सभागृहात मी त्यांचं थेट नाव घेऊन त्यांना अपमानित करणार नाही असंही सतीश महाना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here