कल्याणमधील रुग्णालयात कामावर असलेल्या रिसेप्शनीस्ट तरुणीला झालेल्या बेदम मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, हेच त्याचे काम असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली.
तर, पीडित मुलींच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मनसेने घेतली आहे. उपचारासाठी पीडित मुलीला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले असून घटना घडून 22 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा पोलिसांना सापडला नाही, तो अद्यापही फरार आहे. त्यामुळे, मनसेच्यावतीने पुढील काही तासात आरोपी न सापडल्यास आम्ही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.