पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही युद्ध होऊ शकते. अशावेळी नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या (७ मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुढील १६ ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉकड्रील- १. मुंबई २. उरण-जेएनपीटी ३. तारापूर ४. पुणे ५. ठाणे ६. नाशिक ७. थळ-वायशेत ८. रोहा-धाटाव-नागोठाणे ९. मनमाड १०. सिन्नर ११. पिंपरी-चिंचवड १२. संभाजीनगर १३. भुसावळ १४. रायगड १५. रत्नागिरी १६. सिंंधुदुर्ग