मुकेश अंबानी यांनी भारतीय मनोरंजन क्षेत्राबद्दल व्यक्त केला नवा आशावाद

भारताला मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. आपला कंटेंट, लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाच्या आधेर भारत लवकरच या क्षेत्रात मक्तेदारी करेल असंही ते म्हणाले आहेत. मुकेश अंबानी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५ मध्ये बोलत होते. पुढील दशकापर्यंत भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र चारपटींनी वाढ नोंदवेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. म्हणजेच १०० अरब डॉलरपेक्षा मोठा आकडा गाठू शकतो. सध्या मार्केट २८ अरब डॉलर्सचं आहे.

मुकेश अंबानी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र बनला आहे. कथा सांगण्याची शैली आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे भारताच्या मनोरंजन आणि सांस्कृतिक प्रभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. एआय आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कथा पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवू शकतात. तसंच ते विविध भाषा, देश आणि संस्कृतींमधील प्रेक्षकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतात. मला विश्वास आहे की भारतातील अति-प्रतिभावान तरुण जागतिक मनोरंजन क्षेत्रावर राज्य करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here