‘कर्म हिशेब चुकता करतं,’ गौतम गंभीरला टोला? खेळाडूची पोस्ट व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जूनपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. लीड्समध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असल्याने याकडे चाहत्यांसह, क्रिकेट विश्लेषकांचंही विशेष लक्ष असणार आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्याआधीच एका भारतीय खेळाडूच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये खेळाडूंने कर्माच्या फळाचा उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, वेगवेगळे अंदाज लावले आहेत. खेळाडू कसोट संघात निवड न झाल्याने नाराज असून, त्याचा इशारा गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाकडे आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा खेळाडू जलदगती गोलंदाज मुकेश कुमार आहे, जो इंग्लंडमधून भारतात परतला आहे.

भारतीय जलदगती गोलंदाज मुकेश कुमार इंग्लंड दौऱ्यात ए टीमचा भाग होता. पण त्याला इंग्लंडविरोधातील कसोटी संघात सहभागी करण्यात आलं नाही. यामुळे त्याला इतर खेळाडूंसह मायदेशी परतावं लागलं आहे. १८ जूनला भारतात परतल्यानंतर मुकेशने इंस्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलं आहे की, “प्रत्येक कर्माचा वेळेनुसार हिशेब होतो. तुम्ही नेहमी सावध राहायला हवं कारण कर्म क्षमाशील नाही आणि नेहमीच त्याचे फळ मिळते”.

मुकेश कुमारने आपल्या स्टोरीत कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण त्याच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अनेक चाहते आणि क्रिकेट जाणकरांच्या मते, ही पोस्ट कसोटी संघात निवड न झाल्याच्या नाराजीतून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here