मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना गती, महत्वाच्या १९ कंत्राटांना मंजुरी

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी १९ महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी मिळाली आहे.

एमएमआरडीएकडून १२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील उपनगरे मेट्रोने जोडली आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद झाला आहे. आता हा प्रवास अधिक जलद होणार आहे. एमएमआरडीएने १२ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकीत मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here