राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे ही पत्रकार परिषद पार पडली. गोंदिया ते बलारशा या दुहेरी रेल्वेमार्गाला केंद्राने मंजुरी दिली आहे.यासाठी 4800 कोटी रूपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार कोटींची कामे सुरू आहेत. तसेच, मुंबई परिसरासाठी १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. 238 एसी गाड्या मुंबईसाठी दिल्या जाणार असल्याची माहिती यावेळी आश्विनी वैष्णव यांनी दिली.
गोंदिया बलारशहा मार्गाचे दुहेरिकरणामुळं छत्तीसगडसोबत व्यापार वाढू शकतो. 1 लाख 73 हजार कोटी राज्यात रेल्वे खर्च करतंय. तसंच राज्यातील 132 रेल्वे स्टेशनही वर्ल्ड क्लास केली जाणारेत. 24 हजार 700 कोटी रूपये आपल्याला रेल्वे बजेटमध्ये मिळालेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार असून यात 10 दिवसांची टूर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.