नागार्जुन यांच्या मुलाने केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी त्याची गर्लफ्रेंड जैनब रावदजी हिच्यासोबत आज शुक्रवारी ६ जून रोजी लग्नाच्या बंधनात अकडला. जैनब आणि अखिल गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. तर आता त्यांनी पारंपारिक हिंदू परंपरेनं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नातील कुटुंबातील लोकं आणि जवळचे मित्र-परिवार होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हैदराबादमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्यात इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यात चिरंजीवी, राम चरण आणि प्रशांत नीलसारखे बडे कलाकार सहभागी आहेत. रिपोर्ट्सनुसार, अगदी साधारण पद्धतीनं अखिल आणि जैनब यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नात प्रायव्हसीला प्राधान्य दिलं होतं. वेडिंग लूकविषयी बोलायचं झालं तर अखिल आणि जैनब यांनी पारंपारिक तेलगू लग्नात जसे कपडे परिधान करतात तसे कपडे परिधान केले होते. जैनबनं आयवरी पेस्टर रंगाची साडी आणि सोन्याचे दागिणे परिधान केले होते. तर अखिलनं पांढऱ्या रंगाता कुर्तो आणि धोतर परिधान केलं होतं. त्याच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here