महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला याविरोधात इशारा दिला आहे. दरम्यान, शाळेतील हिंदी भाषेच्या सक्तीचे नरेश म्हस्के यांच्याकडून समर्थन करण्यात आलंय.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के शाळेतील हिंदी भाषेच्या सक्तीचे समर्थन केलं आहे. मराठी व्यापाऱ्यांशी देखील आपण हिंदीत बोलतो. पण मराठीला कुठंही डावललं जात नाही. देशाच्या धोरणाची अंमलबजावणी सरकारकडून केली जात आहे. मराठी भाषा सक्तीची आहे. पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्याची गरज आहे. एखादी उपभाषा शिकलो तर काही कमी पडत नाही. मुलाना वळण मिळावं, चांगली भाषा शिकण्याची संधी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हस्के म्हणाले.