अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, फ्लेक्सने वेधून घेतले लक्ष

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतले दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच कोथरुडमध्ये लागलेल्या एका पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पुण्यातील डेक्कन परिसरात एक भावनिक आणि राजकीय संकेत देणारा फ्लेक्स लावण्यात आला होता, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकत्र यावं, असा आशय व्यक्त करण्यात आला होता. या फ्लेक्सवर “अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात” असा संदेश झळकत होता. त्यासोबतच “सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा” असंदेखील लिहिण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, हा फ्लेक्स शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने लावल्याचं बोललं जात होतं. मात्र, हा फ्लेक्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने किंवा अन्य कारणाने काही तासातच हटवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here