बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. आता नीना गुप्ता यांनी नाती आणि प्रेम या सगळ्यावर वक्तव्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की प्रेमापेक्षा त्यांना गिफ्ट्स आवडतात.
एका मुलाखतीत नीना गुप्ताला विचारण्यात आलं की तिला एक असा पार्टनर आवडेल का जो सरप्राइज प्लॅन करणार नाही किंवा गिफ्ट्स देणार नाही. पण जो कधी कधी प्रेम नक्कीच व्यक्त करतो. त्यावर नीना गुप्ता या त्यांचं मत काय आहे ते सांगत म्हणाल्या, ‘मला प्रेमा पेक्षा जास्त गिफ्ट आवडतात. प्रेमाचा अर्थ काय? मुर्खपणा. मी खूप जास्त मटेरिअलिस्टिक आहे.’