एचआयव्हीवर उपचार करणार आलं नवीन इंजेक्शन!

एचआयव्ही आजाराबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल अनेक वर्षांपासून रिसर्च सुरु आहे. या ल लढ्यात आता एक मोठं शस्त्र समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने एचआयव्हीपासून बचावासाठी एका नव्या इंजेक्शनच्या मंजुरीबद्दल माहिती दिली आहे. या इंजेक्शनचं नाव आहे ‘लेनाकापाविरक’. महत्त्वाचे म्हणजे या इंजेक्शनला अन्न व औषध प्रशासन, अमेरिका कडून मंजुरी मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे, हे इंजेक्शन दरवर्षी फक्त दोन वेळाच द्यावं लागतं. याचा अर्थ या इंजक्शनचा प्रभाव दीर्घकालीन प्रभाव आहे.

आत्तापर्यंत WHO ने PrEP (प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस) साठी गोळ्या, डेपीविरिन वजायनल रिंग, आणि CAB-LA नावाचं प्रभाव पडणाऱ्या इंजेक्शनची शिफारस केली होती. पण लेनाकापाविरक हे नविन इंजेक्शन अधिक सोयीचं आणि कमी डोसमध्ये प्रभावी ठरणारं इंजेक्शन ठरलं आहे. त्यामुळे वारंवार औषध घेण्याची गरज राहत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here