कोकण रेल्वेमार्गावर पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी वेळापत्रकासंदर्भातील माहिती दिली आणि परिपत्रक जारी केले.
यामध्ये दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वे विभागातील सर्व मेल/एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळा १५ जून ते २० ऑक्टोबर पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बदलण्यात येतील.
पावसाळी वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या २३ गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येतील.