अलीकडेच अनेक जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून चांगली कमाई करत आहेत. ज्यात ‘तुंबाड’ आणि ‘लैला मजनू’ यांचा समावेश आहे. त्याच पद्धतीने ‘बाहुबली’चे निर्माते ऑक्टोबरमध्ये ‘बाहुबली: द बिगिनिंग’ (२०१५) आणि ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ (२०१७) या दोन्ही चित्रपटांचे पुन्हा जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्याची योजना आखत आहेत.
यावेळी विशेष म्हणजे, राजामौली हे दोन्ही चित्रपटांचे महत्त्वाचे क्षण एकत्र करून एक नवीन संक्षिप्त रुप तयार करत आहेत. म्हणजेच, जवळपास ६ तासांची कथा एका सुमारे ३ तासांच्या दमदार सिनेमात पाहता येणार आहे. हे एक मोठं सिनेमॅटिक एक्सपेरिमेंट मानलं जात आहे आणि यामुळे चित्रपटसृष्टीत एक नवीन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे.