निलेश चव्हाण याला तीन दिवसीय पोलिस कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असून त्याचा कुटुंबीयांवर खूप प्रभाव होता, असं संशय पोलिसांना आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाला संभाळायची जबाबदारी कशी दिली? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळं पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत ३ जूनपर्यंत निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी हा निर्णय सुनावला आहे.

आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ बोर्डरवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सुट्टीकालीन न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं आहे. या वेळी कोर्टात सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे. तसंच, वैष्णवीच्या बाळाला काय कारणाने जवळ ठेवले. याचीही चौकशी करायची आहे, असं न्यायालयात स्पष्ट केलं होतं. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर निलेश चव्हाण याच्या वकिलांनी आशिलाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं पोलिस कोठडी मिळू नये. फक्त मोबाइल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. पिस्तुल परवाना त्यांच्याकडे आहे त्याचा कुठेही गैरवापर झालेला नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here